Delhi Air Pollution: दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी सम- विषम फॉर्म्यूला यशस्वी होईल? आतापर्यंत किती फायदा झाला?जाणून घ्या सविस्तर
Delhi Air Pollution: दिल्ली सरकारने पुन्हा एकदा राजधानीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 2016, 2017 आणि 2019 मध्येही याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये (Delhi) दिवसागणिक प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा 400 पार झालाय. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण (Pollution) नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सम - विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केजरीवाल सरकारने हा निर्णय जाहीर केला. याविषयी बोलतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलं की, वाढणाऱ्या AQI नियंत्रित करण्यासाठी सम- विषम हा फॉर्म्यूला लागू करणं आवश्यक आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) ने एक विश्लेषण केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 21 ते 26 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीच्या वायू प्रदूषणात वाहने सर्वात जास्त कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा स्थितीत दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहनांना जास्त महत्त्व देऊ शकते.
पहिल्यांदा लागू केला होता सम विषम फॉर्म्यूला
आप सरकारने 2016 मध्ये पहिल्यांदा 'सम - विषम' फॉर्म्यूला लागू केला होता. हे वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि वाढणारा AQI नियंत्रणात ठेवण्यासाठी हा फॉर्म्यूला कामी आला होता. याअंतर्गत दिल्लीत विषम तारखेला विषम क्रमांक असलेली खासगी वाहने आणि सम तारखेला सम क्रमांक असलेली वाहने चालविण्यास परवानगी देण्यात आली होती. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मध्ये 2016 मध्ये लागू करण्यात आलेल्या सम-विषम नियमाच्या परिणामावर एक अभ्यास करण्यात आला आणि संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आले. मात्र, हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेइतकी सुधारणा झाली नाही.
2017 मध्ये पुन्हा लागू झाला हा फॉर्म्यूला
2017 मध्ये, हा नियम पुन्हा लागू झाला आणि यावेळी सरकारला राजधानीत अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत. IIT कानपूरने 2017 मध्ये सम-विषम फॉर्म्यूल्याचा वापर करण्यात आला. त्यानंतर त्यावर अभ्यास देखील केला गेला. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, दिल्लीत वाहन प्रदूषणाचे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे, तर दुचाकी वाहनांमुळे यापेक्षा जास्त प्रदूषण होते. अहवालानुसार दुचाकी वाहनांमुळे 56 टक्के प्रदूषण होते.
2019 मध्ये या फॉर्म्यूल्याला किती यश मिळाले?
नंतर 2019 मध्ये हा नियम पुन्हा लागू करण्यात आला. कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या अभ्यासानुसार, सम-विषमचा विशेष फायदा नाही. दिल्लीतील वाहतुकीमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय दुचाकी वाहनांमुळेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
विश्लेषकांचं म्हणणं काय?
स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ सेवा राम यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, जेव्हा ही योजना लागू केली जाते तेव्हा वाहतूक कोंडी कमी होते आणि त्यामुळे प्रत्येक वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारण्यावर त्याचा किरकोळ परिणाम होतो. त्याच वेळी, सेंट्रल रोड अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ एस वेलमुर्गन म्हणाले की, जर AQI 450 प्लस ते 500 पर्यंत पोहोचला तर सम-विषम लागू केले पाहिजे. त्यासाठी सरकारने देखील काटेकोर नियम करावेत.
हेही वाचा :
Delhi Pollution : मोठी बातमी! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; दिल्लीत प्रदूषणामुळे मोठे निर्णय