एक्स्प्लोर

राजधानीतल्या तळीरामांसाठी खुशखबर, वर्षभरात फक्त तीन ड्राय डे

Delhi Liquor Shops Rule : दिल्ली सरकारने 2022 मधील ड्राय डेच्या संख्येत घट करुन तळीरामांना खुशखबर दिली आहे. 

Delhi Liquor Shops Rule : राजधानी दिल्लीतील तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली सरकारने ड्राय डेच्या दिवसांमध्ये मोठी कपात केली आहे. धार्मिक उत्सव, महान नेत्यांची पुण्यातिथी आणि जयंती मिळून वर्षभरात 21 ड्राय डे होते. या दिवशी दारु विक्री आणि दारु पिण्यावर प्रतिबंध होता. पण आता दिल्ली सरकारने 2022 मधील ड्राय डेच्या संख्येत घट करुन तळीरामांना खुशखबर दिली आहे. 

 दिल्ली सरकारने वर्षभरातील ड्राय डेची संख्या फक्त तीनवर आणली आहे. याआधी राजधानी दिल्लीमध्ये वर्षभरात एकूण 21  ड्राय डे होते. पण आता दिल्लीमधील केजरीवाल सरकारने यंदाच्या वर्षभरासाठी ड्राय डेची संख्या तीन केली आहे. मुंबईत एकूण 29 ड्राय डे आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि दोन ऑगस्ट गांधी जयंती या तीनच दिवशी ड्रायडे असणार आहे. या तीन दिवशी राजधानीमध्ये दारु विक्री आणि दारु पिण्यावर प्रतिबंध असणार आहे. सरकारच्या आदेशानुसार, या तीन दिवशी  L-15 लायसन्स असणाऱ्या हॉटेलमध्ये विक्रीवर बंदी नसणार आहे. 

 दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी ड्राय डे संदर्भात आदेश जारी केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटलेय की, दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 च्या 52 व्या नियमांनुसार, हा आदेश दिला जातोय की वर्ष 2022 साठी दिल्लीत दिल्लीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि दोन ऑगस्ट गांधी जयंती या तीन दिवशी ड्राय डे म्हणून पाळला जाईल. L-15 लायसन्स असणाऱ्या हॉटेलमध्ये या तीनही दिवशी दारु विक्रीवर बंदी नसेल.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मार्च 2021 मध्ये ड्राय डेची संख्या घटवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, राज्यातील ड्राय डेची संख्या कपात करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने नुकतेच कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. त्यानुसार, दारु विक्री रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला होता.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरेUddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्याJaysingrao Pawar on Mogalmardini Tararani : मोगलमर्दिनी महाराणी ताराराणींची शौर्यगाथा कहाणी जगासमोर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Embed widget