मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले 'आम आदमी पक्षा'च्या विचारसरणीचे तीन स्तंभ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 'आम आदमी पक्षा'च्या विचारसरणीचे तीन स्तंभ सांगितले आहेत.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या विचारसरणीच्या तीन स्तंभांबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "पक्षाच्या विचारसरणीचा पहिला आधारस्तंभ कट्टर देशभक्ती आहे. आम्ही आमच्या देशासाठी मरायला तयार आहोत, शिवाय पक्षाच्या विचारसरणीचा दुसरा आधारस्तंभ कट्टर प्रामाणिकपणा आहे. तर पक्षाच्या विचारसरणीचा तिसरा स्तंभ मानवता आहे."
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून पक्षाच्या विचारसरणीच्या तीन स्तंभाबद्दल माहिती सांगितली आहे. त्यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'रोजगार बजेट' सादर केल्याचे सांगितले. ते म्हणाले, "पंजाबमध्ये नुकतेच प्रामाणिक सरकार स्थापन झाले आहे. आता देशातील सर्व पक्ष वीज आणि रोजगारावर बोलतात. दिल्ली विधानसभेत सादर झालेला अर्थसंकल्प हा निव्वळ कागदोपत्री नाही, तर तो ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. रोजगाराची समस्या 1947 पासून आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर निवडणुकीपूर्वी चर्चा होत असे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपले सरकार स्थापन झाल्यानंतर एवढ्या लाख नोकऱ्या देऊ असे सांगितले. परंतु, निवडणुकीनंतर त्यावर कोणी बोलले नाही."
आम आदमी पार्टी की विचारधारा के तीन स्तंभ हैं -
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 29, 2022
1. कट्टर देशप्रेम
2. कट्टर ईमानदारी
3. इंसानियत
दिल दिया है, जाँ भी देंगे,
ए वतन तेरे लिए
"दिल्ली सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही एवढ्या नोकऱ्या देण्याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या कशा दिल्या जातील याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट मी तयार केली आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून अनेक फोन येत असून अर्थसंकल्पावर तरुणाई खूप खूश आहे. आम्ही विजेबद्दल बोललो त्यावेळी सर्वजण विजेबद्दल बोलू लागले. परंतु, आता आम्ही रोजगाराबद्दल बोलत आहोत. त्यामुळे इतर पक्षांनाही देशात रोजगार द्यावा लागेल. या अर्थसंकल्पाने संपूर्ण दिल्लीलाच नाही, तर देशातील तरुणांना आशा दिली आहे.
केजरीवाल यांनी यावेळी काँग्रेस आणि भाजपवर हल्लाबोल केला, ते म्हणाले, "काँग्रेसने कॉमनवेल्थसारखे घोटाळे केले. तर भाजपने राफेल, सहारा-बिर्ला, कॉफिनसारखे घोटाळे केले. काँग्रेसने बोफोर्स घोटाळा तेला तर भाजपने राफेल घोटाळा केला. सिग्नलला गाडी थांबल्यानंतर मुले भीक मागताना दिसतात. या मुलांसाठी आम्ही बोर्डिंग स्कूल बनवणार आहोत.
महत्वाच्या बातम्या