एक्स्प्लोर
भाजपसह संघाचे नेते दाऊदच्या हिटलिस्टवर होते, एनआयएचा दावा
नवी दिल्लीः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम धार्मिक भावना भडकवायचा, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे. दाऊद केवळ भावनाच भडकवत नव्हता, तर त्याच्या निशाण्यावर आरएसएस आणि भाजपचे नेतेसुद्धा होते. दाऊद केवळ हिंदूनाच टार्गेट करत नव्हता, तर त्याने चर्चवर हल्ला करण्याचा देखील कट आखला होता, असा दावा एनआयएने केला आहे.
ज्यांनी आरएसएस आणि भाजप नेत्यांविरोधात कट रचला, अशांतता निर्माण केली, चर्चवर हल्ला करण्याचा कट रचला, अशा डी कंपनीच्या 10 जणांवर एनआयए पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच हा कट रचण्यात आला होता, अशी माहितीही एनआयएने दिली आहे.
याकूबच्या फाशीचा बदला
दाऊदने 2 नोव्हेंबर 2015 साली गुजरातमध्ये संघाचे नेते शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री या दोघांची हत्या केली होती. या दोघांचीही हत्या करण्यासाठी दाऊदकडून शार्पशूटरला सुपारी देण्यात आली होती. हत्येनंतर शार्पशूटरला अटक करण्यात आली.
आरएसएसने याकूब मेमनला फाशी देऊन 1993 च्या स्फोटाचा बदला घेतला आहे, असा दावा शार्पशूटरने केला होता.
हिटलिस्ट तयार होती!
दरम्यान, एनआयएला तपासाअंती माहिती मिळाली की, पाकिस्तानस्थित जावेद चिकना आणि दक्षिण अफ्रिकेचा जाहिद मिया उर्फ जाओ हे दोघे बंगाली आणि मिस्त्री यांच्या हत्येचे मास्टरमाईंड होते. चिकना आणि जाओ यांचा देशातील इतर धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याचा कट होता, ज्यामुळं देशात अशांतता निर्माण होईल. सोबतच त्यांनी भाजप नेते आणि आरएसएसची हिटलिस्ट देखील तयार केली होती.
दाऊद विरुद्ध स्वतंत्र चार्जशीट
एनआयएने पाकमध्ये असलेल्या चिकना याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली होती. सोबतच भारताने पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेसह इतर काही देशांची सुद्धा मदत मागितली होती. एनआयए सध्या डी कंपनीच्या 10 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणार आहे. या दहा जणांपैकी सात जणांना मागच्या वर्षी पकडण्यात आले आहे. मात्र, दाऊद विरोधात एनआयए आत्ताच आरोपपत्र दाखल करणार नाही, सबळ पुरावे मिळाल्यानंतर दाऊद विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
गुजरातमधील हत्याकांडाचे मास्टरमाईंड जाओ आणि चिकना या दोघांविरोधात अगोदरच रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेली आहे. चिकना याचे नाव 48 मोस्ट वाँटेडच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. ज्यात हाफिज सईद आणि दाऊद यांचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement