एक्स्प्लोर
लग्नादरम्यान हवेत गोळीबार, गोळी लागून डान्सर तरुणीचा मृत्यू
एका लग्नसोहळ्यात बंदुकीची गोळी हवेत झाडणं तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. विराटपूर गावातल्या लग्नादरम्यान एका व्यक्तीने आनंदाच्या भरात हवेत गोळी मारली. परंतु ती गोळी मंचावर नाचणाऱ्या तरुणीच्या डोक्याला लागली आणि ती मंचावरच कोसळली.
पाटना : बिहारमधल्या सहरसा जिल्ह्यात एका लग्नसोहळ्यात बंदुकीची गोळी हवेत झाडणं तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. विराटपूर गावातल्या लग्नादरम्यान एका व्यक्तीने आनंदाच्या भरात हवेत गोळी मारली. परंतु ती गोळी मंचावर नाचणाऱ्या तरुणीच्या डोक्याला लागली आणि ती मंचावरच कोसळली. या घटनेत डान्सर तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. मधू उर्फ आकृती असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
सोनवर्षा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गावात एक लग्न होतं. या लग्नात डान्सर मधू उर्फ आकृती एका भोजपुरी गाण्यावर नाचत होती. त्याचवेळी लग्नाला आलेले काही लोक नोटांचे बंडल हवेत उडवून त्यावर गोळी मारत होते. एका इसमाने नोटांचा बंडल हवेत उडवला, तो त्यावर गोळीबार करत होता. परंतु त्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी थेट डान्सर मधूच्या डोक्यात घुसली. गोळी लागताच मधू जागेवर कोसळली.
VIDEO पाहा : बिहारमध्ये लग्नादरम्यान हवेत गोळीबार, डान्सर तरुणीचा मृत्यू | एबीपी माझा
ही घटना शुक्रवारी घडली आहे. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यास दिरंगाई केली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी विराटपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सोनवर्षा पोलीस ठाण्याचे फौजदार सुमन कुमार यांना तात्काळ निलंबित केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement