एक्स्प्लोर
सायरस मिस्त्रींविरोधात 93 टक्के मतं, TCSच्या संचालकपदावरुन हटवलं
टाटा समूहाची प्रमुख कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक पदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. कंपनीच्या सर्वसाधारण सभेत (ईजीएम) उपस्थित 93.11 टक्के शेअरधारकांनी मिस्त्रींना हटविण्याच्या बाजूनं मतदान केलं.
सायरस यांनी हटविण्यासाठी टाटा सन्सच्या विशेष प्रस्तावावर विचार करण्यासाठी ईजीएममध्ये टीसीएसच्या 197.04 कोटी शेअर असणाऱ्या 170.95 कोटी शेअर असणाऱ्या शेअरधारकांनी मिस्त्री यांना हटवण्यासाठी मतदान केलं.
कंपनीच्या मते, 93.11 टक्के शेअरधारकांनी मिस्त्री यांनी हटवण्याच्या बाजूनं मतदान केलं. तर 6.89 टक्के शेअरधारकांनी मिस्त्रींच्या बाजूनं मतदान केलं. टीसीएसमध्ये टाटा सन्सचे तब्बल 73 टक्के शेअर आहेत.
दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं होतं. पण तरीही टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे ते प्रमुख होते. त्यामुळे आता त्यांना इतर कंपन्यांच्या प्रमुखपदावरुन हटविण्यात येत आहे.
टाटा सन्सची सहाय्यक कंपनी टाटा इंडस्ट्रीजनं कालच सायरस मिस्त्रींना संचालक पदावरुन हटवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement