(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone News : चक्रीवादळ आज चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकणार, तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात काय स्थिती?
मंदोस चक्रीवादळ (Mandos Cyclone) आज (9 डिसेंबर) चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडूतील (Tamilnadu) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे.
Cyclone News : बंगालच्या उपसागरात 'मंदोस' चक्रीवादळ (Mandos Cyclone) निर्माण झालं आहे. हे वादळ आज (9 डिसेंबर) चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडूतील (Tamilnadu) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे. येत्या 48 तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकते, असा अंदाज हवामान खात्यानं (India Meteorological Department) वर्तवला आहे. हा धोका ओळखून तामिळनाडू सरकार सतर्क झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि SDRF च्या 400 जवानांचा समावेश असलेल्या 12 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चेन्नई आणि तमिळनाडूच्या इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आतापर्यंत, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या 17 जिल्ह्यांमध्ये आज (शुक्रवार) शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. IMD दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळं कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
मंदोस चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम?
या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील आठवड्याची सुरुवातीला मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 12 डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
12 ते 15 डिसेंबर पावसाचा अंदाज
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12, 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: