एक्स्प्लोर

Cyclone Asani : 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग; IMD कडून इशारा, 'या' भागांसाठी 'रेड अलर्ट'

Cyclone Asani : या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्र विभागाने (IMD) “रेड अलर्ट” जारी केला असून आपत्ती व्यवस्थापनाकडून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  

Cyclone Asani : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे, बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी

चक्रीवादळ 'असनी' हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे 330 किमी अंतरावर असल्याने, मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 'असनी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे, त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, हे वादळ आज काकीनाडा किंवा विशाखापट्टणमजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचू शकते. विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस राजली या नौदल हवाई स्थानकांवर बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण, तसेच गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.  दरम्यान चक्रीवादळाशी सामना देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता
आंध्र प्रदेशातील IMD ने माहिती दिली आहे की, आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास ते 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

Cyclone Asani : 'असनी' चक्रीवादळाने बदलला मार्ग; IMD कडून इशारा, 'या' भागांसाठी 'रेड अलर्ट

चक्रीवादळ 'असनी' ने मार्ग बदलला

चक्रीवादळ 'असनी' ने आपला मार्ग बदलला आहे, या चक्रीवादळाला सामना देण्यासाठी अनेक राज्यांचे हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सक्रियपणे काम करत आहेत. पूर्व किनारपट्टीजवळ आल्यानंतर वादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे वादळ पूर्व किनार्‍याकडे सरकत असून, त्यामुळे बाधित भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून पाऊसही पडताना दिसत आहे. सोमवारी हे वादळ विशाखापट्टणमपासून 550 किमी दक्षिण-पूर्व, पुरीच्या दक्षिणेस 680 किमी होते. ते 100 ते 110 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लगतच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत मच्छीमारांनी पुढील किमान दोन दिवस या भागात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत ढगाळ वातावरण 
असनी चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनार्‍यालगत अरबी समुद्रावर देखील होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण आणि घाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर ठाणे अंतर्गत भागात कमी स्वरूपात पाऊस पडू शकतो. मुंबईत बहुतांशी ढगाळ वातावरण असेल, तर मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

ओडिशा सरकारने योजना आखल्या

ओडिशा सरकारने चार किनारी जिल्ह्यांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आखली आहे. ओडिशाच्या सर्व बंदरांवर रिमोट चेतावणी देण्यात आली आहे. हे चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान पूर्व किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Embed widget