एक्स्प्लोर

सायबर गुन्ह्याचं नेटवर्क 'जामताडा'; झारखंडच्या या चार शहरांमध्ये दिलं जातंय सायबर क्राईमचं ट्रेनिंग

ऑनलाइन व्यवहारामुळे सर्व गोष्टी चुटकीसरशी होतात. मात्र, असे करताना सायबर गुन्हेगारांपासून सावधान राहण्याची गरज आहे. कारण, बँक खाती हॅक करुन लाखो लोकांना गंडा घातला जात आहे. वाचा यावरचा स्पेशल रिपोर्ट.

लखनौ : सध्या संपूर्ण देश कोरोना संटकाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता नवीन संकट सर्वसामान्यांसमोर उभं राहिलं आहे ते म्हणजे सायबर क्राईम. कधी कोणाला फोन येईल अन् त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होईल याची शास्वती नाही. फॉरेन टूर, एटीएम ब्लॉक, पेन्शन व इन्शुरन्स स्कीम, पेटीएम सारख्या ई वॉलेट वेरीफिकेशनच्या नावावर लोकांना गंडा घातला जातो. मात्र, याचं ट्रेनिंग दिल जातं असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना? पण, हे खरं आहे. हे सर्व शिकवण्यासाठी कोचिंग इंस्टिट्यूट चालवले जात आहेत. एक प्रकारे सायबर क्राइमचं पूर्ण विद्यापीठचं चालवलं जातं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सायबर क्राईमची नर्सरी झारखंडच्या चार शहरात बिहार आणि पश्चिम बंगाल ओलांडल्यानंतर झारखंडचा भाग सुरु झाल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर घनदाट झाडी आणि जंगल दिसतात. मात्र, तुम्हाला माहिती नसेल की झारखंड मधील चार शहरातील तरुणांनी पूर्ण देश आणि खासकरुन उत्तर प्रदेशला त्रासून सोडलं आहे. या सायबर क्राईमला रोखण्यासाठी यूपी पोलीस आणि देशातील अन्य राज्यातील पोलीस प्रयत्न करत आहेत. त्या सायबर गुन्ह्याचा सर्वात मोठा अड्डा झारखंडच्या चार जिल्ह्यात आहे. जामताडा, गिरिडीह, देवघर आणि दुमका हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील घरात बसलेली मुलं क्षणभरात हायटेक शहर बंगळूर, मायानगरी मुंबई, राजधानी दिल्ली नाहीतर कोणत्याही शहरातील व्यक्तीला एका फोनवर त्याची आयुष्यभराची कमाई गायब होते. एटीएम क्लोनिंग, बँक अकाउंट हँकिंगचं ट्रेनिंग या शहरामध्ये सायबर गुन्ह्याचं अगदी नर्सरीपासून ते विद्यापीठांपर्यंत शिक्षण दिलं जातंय. यात तत्काळ पैसा कमवणे, महागडे फोन घेण्याच्या नादात सायबर क्राईमच्या जाळ्यात ही मुलं अडकतात. त्यांना गुन्ह्यात आणण्यासाठी शहर, गाव किंवा वस्तीवरील मोठ्या माणसं मदत करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. सायबर क्राईम मधील या गुन्हेगारांना एखाद्या कॉलेज, विद्यापीठांतील सीनिअर, जुनिअर म्हणून ओळखले जाते. इथं एटीएम क्लोनिंग, बँक अकाउंट हँकिंग, ग्राहकांना फसवण्यासाठी कस्टमर केअर एक्झिक्युटीव सारखं बोलवण्यासाठी या शहरांमध्ये कोचिंग चालते. धक्कादायक! मुलीशी लग्न न लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापाचा तब्बल 8 वर्षानंतर खून  लखनौमध्ये पकडलेल्या टोळक्याकडून धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी लखनौ सायबर सेलच्या पथकाने याच शहराशी संबंधीत एक गँगच्या मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान या गँगकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा गुन्ह्यांना तडीस नेण्यासाठी वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. प्रत्येक ग्रुपमध्ये काम करण्यासाठी टक्केवारी दिली जाते. एक व्यक्ती 10 ते 15 मोबाईल घेऊन 1 दिवस वापरतो. मोबाईल बनावट नाव, पत्त्याच्या सिमसह नव्या मुलाला दिला जातो. ही मुलं इंटरनेटच्या माध्यमातून शोधलेल्या नंबरवर फोन करुन लोकांना आकर्षिक करणाऱ्या मोठमोठ्या स्किम सांगितल्या जातात. या बोलण्यातून ओटीपी, बँक अकाउंट, एटीएम कार्ड नंबर मिळवून सर्व माहिती गँगच्या सीनियर मेंबरला दिली जाते. हा सिनिअर हा नंबर दुसऱ्या एका गटापर्यंत पोहचवतो. हा ग्रुप टारगेटच्या बँक खात्यातून बनावट नावाने उघडलेल्या बँक खात्यात वळवतो. एवढचं नाही तर हे साइबर क्रिमिनल ऑनलाइन ट्रांजक्शनला छोट्या, छोट्या हिश्यात दूसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. बऱ्याचवेळा पेटीएम वॉलेटमधूनही रक्कम ट्रान्सफर केली जाते. लखनौ साइबर सेल मुसक्या आवळलेल्या गँगकडून 53 लाख सारखी मोठी रक्कम 10,000, 5000 आणि 2000 च्या तुकड्यात अनेक बँक खात्यात ट्रान्सफर केली होकी. हे बँक खाते लखनौ नाही तर मुंबईमध्ये वापरण्यात आले होते. सायबर गुन्ह्याचं मोठं नेटवर्क 'जामताडा' सध्या जामताडाच्या प्रत्येक घरात सायबर क्राईमचं मोठं नेटवर्क चालवलं जात आहे. जामताडातील ही गुन्हेगारी एखादा संसर्गजन्य आजार पसरावा तशी गिरिडीह देवघर आणि दुमकापर्यंत पोहचली आहे. बिहारच्या बांकामधील तरुण देखील या जाळ्यात अडकले आहेत. सायबर गुन्ह्यातून मिळवलेली माया पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यात इन्वेस्ट केली जात आहे. दरम्यान, या सायबर गुन्ह्यावर 'जामताडा' नावाची वेबसिरीज देखील आली आहे. Nagpur Crime | नागपुरातील माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget