एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! मुलीशी लग्न न लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापाचा तब्बल 8 वर्षानंतर खून
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील कोंडगावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी लग्न न लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापाचा तब्बल 8 वर्षानंतर खून करण्यात आला.
रत्नागिरी : नातेसंबंध, प्रेमसंबंधांमध्ये अपयश आणि त्यानंतर खून, जीवघेणा हल्ला या घटना काही आता नवीन नाहीत. प्रेमात आलेला नकार किंवा आलेलं अपयश यानंतर असे अनेक प्रकार घडत आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील कोंडगावात देखील अशीच काहीशी घटना घडली आहे. 8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला. त्यानंतर मनात राग असलेल्या तरूणानं 8 वर्षानंतर मुलीच्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
14 ऑगस्टच्या रात्री आरोपी अभिजीत पाटील हा सुभाष काळोखे यांच्या घरी गेला. यावेळी सुभाष काळोखे एकटे असल्याचं पाहत अभिजीतनं त्यांच्या डोक्यात दगडी जात्या घालत त्यांचा खून केला. त्यानंतर घटना स्थळावरून आरोपी अभिजीत पाटील हा पसार झाला. सुभाष रामचंद्र काळोखे वय वर्षे 73 असं मृत व्यक्तिचं नाव असून या प्रकरणी देवरूख पोलिसांनी अभिजीत पाटील या आरोपीला अटक केली आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी अभिजीत हा रत्नागिरी जवळच्या नाचणे गावात राहत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवलं; पारनेर मधील घटना
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार 2012 साली अरोपी अभिजीत पाटील यानं सुभाष काळोखे यांच्याकडे मुलीशी लग्न करण्याची इच्छ व्यक्त केली होती. पण वडिलांनी मात्र या गोष्टीला नकार दिला होता. त्यानंतर देखील अभिजीत पाटील हा सतत लग्नासाठी तगादा लावत होता. अखेर एक दिवशी सुभाष यांनी अभिजीतच्या कानशिलात देखील लागावली होती. तोच राग मनात ठेवत अभिजीत पाटीलनं तब्बल 8 वर्षानंतर मुलीच्या बापाचा खून केला. 14 ऑगस्टच्या रात्री अभिजीत कोंडगाव येथे पोहोचला. त्यानंतर त्यानं सुभाष काळोखे एकटे असल्याचा फायदा घेत त्यांच्या डोक्यात दगडी जात्या घालत घटनास्थळावरून पसार झाला. मध्यरात्री हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुभाष यांच्या मुलानं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानुसार देवरूख पोलिसांनी वेगानं सूत्र हालवत आरोपी अभिजीत पाटीलला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाचा आणखी तपास हा देवरूख पोलीस करत आहेत.
साताऱ्यात एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; बँक अधिकाऱ्यांकडून 41 लाखांची फसवणूक; कुटुंबीयांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
भारत
Advertisement