एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

COWIN App Registration: कोविन ॲपवर लसीकरण नोंदणीला सुरुवात, पहिल्या एका तासात 18 वर्षांवरील 35 लाख लोकांची नोंदणी

COWIN App Registration: देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे.

COWIN Registration : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मात्र नोंदणी करताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत. दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन
नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले जात आहेत. ट्वीटरवर वेटिंग फॅार ओटीपी, ने ओटीपी, स्लॅाट, ओटीपीज, अपॅाईंटमेंट असे ट्रेंड सुरु आहेत.  आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झालं असल्याची माहिती आहे.

आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होणार आहे. 

को-विन (CoWIN) पोर्टल अधिक कार्यक्षम केल्याची माहिती

कोविड 19 लस नोंदणीसाठी को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?

    • इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं "Get OTP" या बटणावर क्लिक करा.
    • एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
    • ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन "Verify" या बटणावर क्लिक करा.
    • ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही "registration of Vaccination" अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
    • सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर "Register" या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा "Schedule Appointment" वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं "Book Appointment for Vaccination page" असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

इतर माध्यमातून नोंद करता येते का?
होय, आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते.

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
ज्यांचे वय हे 45 वर्षावर आहे आणि त्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांना लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी आपल्याला गंभीर आजार असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे. या लोकांना तसेच ज्यांचे वय 60 वर्षावर आहे त्यांना आधार कार्ड, व्होटिंग आयडी नंबर अथवा अधिकृत फोटो आयडी नंबर द्यावा लागणार आहे.

लसीकरणासाठी आपण ठिकाण निवडू शकतो का?
होय, लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
Embed widget