(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कृती सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. काही क्षणात ही पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी कृती सेननच्या फोटोवर केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आहेत.
अभिनेत्री कृति सेननने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कृतीचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये कृतीने लिहिले की, “Salsa anyone? कृतीने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नाही.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी कृतीच्या फोटोवर “Wow” म्हणत एक लाल रंगाचा हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे. कृतीने देखील बिगबींच्या या पोस्टवर पिंक हार्ट इमोजी आणि हात जोडलेला इमोजी शेअर करत रिप्लाय दिला आहे. कृतीनं शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांची देखील पसंती मिळाली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी हसण्याचा इमोजी या पोस्टवर शेअर केला आहे. काही क्षणात ही पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे. या फोटोला अनेकांना चांगल्या कमेंट दिल्या तर याच फोटोवर काहींनी मजेदार मिम्स तयार करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
गेल्या वर्षी बिग बी यांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ यांच्याबरोबर मुलगा अभिषेक, पत्नी ऐशवर्या, नात आराध्या यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या त्यांच्या अनेक चित्रपटांचे शुटिंग सुरु आहे. कोण बनेगा करोडपती 12 हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर अमिताभ ब्रह्मस्त्र आणि चेहरे या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते.