Coronavirus Update : देशात कोरोनाबळींचा आकडा वाढताच, एका आठवड्यात 5 हजारहून अधिक मृत्यू
Coronavirus Update : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Covid19 Deaths In India : देशात कोरोनारुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. सलग तिसऱ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, देशात कोरोनारुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि आता त्यांची संख्या 18,84,937 वर आली आहे, जी एकूण संक्रमित संख्येच्या 4.59 टक्के आहे.
देशात गेल्या 24 तासांत 959 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील आकडेवारीत रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात कोविडमुळे 5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविडमुळे सर्वाधिक 374 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्याची कोरोनाबळींची आकडेवारी
- 31 जानेवारी - 959 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 30 जानेवारी - 891 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 29 जानेवारी - 871 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 28 जानेवारी - 627 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 27 जानेवारी - 573 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 26 जानेवारी - 665 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- 25 जानेवारी - 614 कोरोना रुग्णांचा मृत्यू
- सात दिवसांमध्ये एकुण 5200 कोरोना रुग्णांचा मृत्यू
या सात दिवसांमध्ये एकुण कोरोनामृतांचा आकडी 5200 इतका झाला आहे. कोरोनारुग्णांच्या मृत्यूचा हा वाढता आकडा चिंताजनक आहे. देशात एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये घट होतेय, मात्र रुग्णांच्या वाढते मृत्यू पाहता प्रशासना लमोर मोठं आव्हान आहे.
इतर बातम्या :
कोरोना लसीमुळे 21 आजारांपासून संरक्षण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
Corona Vaccine : कोविन अॅपवर नोंदणीनंतरच मेडीकलमध्ये मिळणार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन
कॅनडाचे पंतप्रधान अज्ञातवासात, आंदोलक पेटले; काय आहे प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha