(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India's Biggest Data Theft: देशातील सर्वात मोठी डेटा चोरी; तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला
तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, तर कुणाचा वैयक्तिक डेटा, अशी पद्धतीने डेटा चोरीला गेला आहे.
India's Biggest Data Theft : देशातील सर्वांत मोठी डेटा चोरी झाली आहे. तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, कुणाचा वैयक्तिक डेटा, अशी पद्धतीने डेटा चोरीला गेला आहे. या प्रकरणात हैदराबाद, तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी लोकांचा वैयक्तिक डेटा होता. या व्यक्तीला पोलिसांनी 31 मार्च रोजी सुमारे 70 कोटी लोकांचा आणि कंपन्यांचा डेटा चोरून विकल्याप्रकरणी अटक केली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला डेटा 24 राज्ये आणि 8 मेट्रो शहरांमधील लोकांशी संबंधित आहे. दिल्लीपासून गुजरातपर्यंत या सायबर चोराकडे क्रेडिट कार्डपासून ते लोकांच्या मार्कशीटपर्यंतचा डेटा होता. हा सर्व डेटा एका वेबसाईटवर ऑनलाईन विकला जात होता.
चला जाणून घेऊया या सर्वात मोठ्या डेटा चोरीची संपूर्ण कहाणी...
नेटवर्क हरियाणातून सुरू होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरियाणातील फरिदाबाद येथील InspireWebz नावाच्या वेबसाइटद्वारे लोकांचा डेटा ऑनलाईन विकत होता. पोलिसांना आरोपींकडून बायजूस आणि वेदांतूसारख्या ऑनलाईन शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्थांचा डेटा मिळाला आहे. यासोबतच 24 राज्यांचा जीएसटी आणि आरटीओचा डेटाही या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना आरोपींकडून संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक, सरकारी कर्मचारी, पॅनकार्डधारक, ज्येष्ठ नागरिकांसह इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खाते, अनेक लोकांचे मोबाईल नंबर, एनईईटीच्या विद्यार्थ्यांचा डेटा, देशातील अनेक श्रीमंत व्यक्तींशी संबंधित गोपनीय माहिती, विमाधारकांचे तपशील, क्रेडिट आणि डेबिट कार्डसह भरपूर डेटा मिळाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी क्लाउड ड्राईव्ह लिंकमधील डेटाबेस खरेदीदारांना विकला होता. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत, ज्यामध्ये सरकारी, खासगी कंपन्या आणि लोकांशी संबंधित 135 गोपनीय आणि खासगी डेटा सापडला आहे.
कोणत्या राज्यातून किती लोकांचा डेटा चोरीला?
या सर्वात मोठ्या डेटा चोरीच्या राज्यनिहाय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशातील 21.39 कोटी लोकांचा डेटा आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. यानंतर मध्य प्रदेशातील 4.50 कोटी, दिल्लीतील 2.70 कोटी, आंध्र प्रदेशातील 2.10 कोटी, राजस्थानमधील 2 कोटी आणि जम्मू-काश्मीरमधील 2 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला आहे. या यादीमध्ये केरळमधील 1.57 कोटी, पंजाबमधील 1.5 कोटी, बिहारमधील 1 कोटी आणि हरियाणातील 1 कोटी लोकांचा डेटा समाविष्ट आहे. डेटाच्या या तिजोरीत म्युच्युअल फंडापासून ते सोशल मीडिया अकाउंट्सपर्यंतची माहिती चोरीला गेली. आरोपींकडून Amazon, Netflix, YouTube, Paytm, PhonePe, Big Basket, BookMyShow सारख्या कंपन्यांचा डेटा जप्त करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :