एक्स्प्लोर

कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 10 हजार नवे रुग्ण; रुग्ण वाढिमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 लाख 26 हजार 770 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 6348 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 9 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

भारतात नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बुधवारी ब्राझीलमध्ये 27312 आणि अमेरिकेमध्ये 20578 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर रुसमध्ये 8536 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ देशातील नव्या रुग्णांच्या वाढिचा वेग जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आज 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, ब्राझील, रुस, ब्रिटन, स्पेन आणि इटलीनंतर कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पाहा व्हिडीओ :  8 जूनपासून सुरु होणाऱ्या अनलॉक 1.0 साठी केंद्राची नियमावली, काय काय सुरु होणार?

कोणत्या राज्यांत, किती मृत्यू?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2710, गुजरातमध्ये 1155, दिल्लीमध्ये 650, मध्य प्रदेशमध्ये 377, पश्चिम बंगालमध्ये 355, उत्तर प्रदेशमध्ये 245, तमिलनाडुमध्ये 220, राजस्थानमध्ये 213, तेलंगानामध्ये 105, आंध्र प्रदेशमध्ये 71, कर्नाटकमध्ये 57, पंजाबमध्ये 47, जम्मू-कश्मीरमध्ये 35, बिहारमध्ये 29, हरियाणामध्ये 24, केरलमध्ये 14, झारखंडमध्ये 6, ओडिशामध्ये 7, असाममध्ये 4, हिमाचल प्रदेशमध्ये 5, मेघालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठीचे लॉकडाऊन वाया गेले : राहुल गांधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल बजाज यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

संबंधित बातम्या : 

पुढील दोनतीन महिन्यात कोरोना संसर्गावर औषध उपलब्ध होईल; CSRI चे डॉ. शेखर मांडे यांची माहिती 'लॉकडाऊनमध्ये अनेक चुका, अर्थव्यवस्था कोलमडली', उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी राहुल गांधींची बातचीत जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात बदल, कांद्यासह अनेक शेतमालावर सरकारी नियंत्रण नाही; केंद्र सरकारचा निर्णय
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget