सीरमच्या कोरोना लसीची किंमत किती? आदर पूनावालांनी दिली माहिती
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोना लशीच्या किंमती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय सकारात्मकतेनं कोरोनाशी सुरु असणारा लढा जिकंण्याची जिद्द प्रत्येकानंच उराशी बाळगलेली असतानाच भारतीयांसाठी एक खास भेट केंद्रानं दिली. सीरमच्या covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ज्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणांना धीर मिळाला आणि देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोना लशीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. अदार पूनावाला म्हणाले, वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षीत आहे. सरकारसाठी आम्ही लस खास किंमतीमध्ये देणार असून लशीची किंमत 180 ते 240 रुपये प्रती डोस असणार आहे. त्यानंतर आम्ही खासगी बाजारात लस आणू तेव्हा त्या लशीची किंमत 430 ते 580 रुपये असणार आहे. येत्या आठवड्यांमध्ये कोविशिल्ड येत्या आठवड्यांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.
ABP Newsला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी लसीबाबतच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. कोरोनाची लस नेमकी कितपत सुरक्षित आहे, या प्रश्नाचं उत्तर देत त्यानी ही लस ऑक्सफर्डमधील काही निष्णांत शास्त्रज्ञांनी विकसित केल्याची बाब अधोरेखित केली. शिवाय लसीबाबचा सर्व तपशील हा अनेक टप्प्यातील पडताळणीनंतरच हाती आल्याचंही ते म्हणाले. शिवाय या लसीला युकेमध्येही मान्यता मिळाली असून, आपल्या परिनं सर्व निकषांवर लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात आल्याचा विश्वास त्यांनी दिला. लस घेतल्यानंतर होणाऱ्या काही परिणामांबाबत सांगताला, हलकी डोकेदुखी, किंवा किरकोळ ताप जाणवू शकतो. पण, अशा वेळी पॅरासिटामोलच्या गोळीनं परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यासाठी चिंता करण्यातं किंवा गोंधळण्याचं कारण नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
संबंधित बातम्या :