(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | देशात कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवशी 1.53 लाख नव्या रुग्णांची भर
Coronavirus : देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत असून देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 10 लाखांच्या वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपला जोर कायम ठेवला असून शनिवारी एकाच दिवसात देशात कोरोनाच्या एक लाख 53 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सलग सहाव्या दिवशी एक लाखाच्या वर कोरोना रुग्णांची भर पडल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 839 इतक्या रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
गेल्या 24 तासात 90,584 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात एक लाख 45 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण 25 कोटी 66 लाख 26 हजार चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी एकाच दिवसात 14 लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
देशात एक वेळ अशी होती की कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आले होते. पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
देशातील कोरोनाची स्थिती
- एकूण कोरोना रुग्ण संख्या - एक कोटी 33 लाख 58 हजार 805
- एकूण डिस्चार्ज- एक कोटी 20 लाख 81 हजार 443
- एकूण अॅक्टिव्ह केस- 10 लाख 46 हजार 631
- एकूण लसीकरण- 10 कोटी 15 लाख 95 हजार 147 डोस
शनिवारी राज्यात तब्बल 53 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 55411 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 27,48,153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 % एवढे झाले आहे. शनिवारी राज्यात 309 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.72 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं पाऊले उचलायला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Lockdown : राज्यात कडक लॉकडाऊन अटळ? कोविड टास्क फोर्सची आज बैठक
- Mumbai Mayor on Lockdown: कोरोनाची ही लाट म्हणजे त्सुनामी, नागरिकांचा जीव वाचवण्यालाच आमचं प्राधान्य- किशोरी पेडणेकर
- Corona Vaccination | देशभरात आजपासून 'लस उत्सव'; अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य