Coronavirus updates | आतापर्यंत देशात 2.26 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस
कोरोना लसीकरणाच्या 50 व्या दिवशी सोमवारी एकाच दिवसात 16,96,588 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलंय. भारतात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
यामध्ये 70,41,584 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे आणि 37,12,906 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे. 67,73,081 फ्रन्टलाईन वर्कर्सनी कोरोनाची पहिला डोस घेतला आहे तर 3,13,835 फ्रन्टलाईन वर्कर्सनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 60 वर्षापरील 6,58,918 लोकांना कोरोनाची लस देण्यात आला आहे.
कोरोना लसीकरणाच्या 50 व्या दिवशी सोमवारी एकाच दिवसात 16,96,588 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 14,30,954 लोकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला असून 2,65,634 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतला.
CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
देशात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारील आणि फ्रन्टलाईन वर्कस यांना कोरोनाची लस देण्यात आली. देशात आता कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये 60 वर्षापरील नागरिक आणि ज्या लोकांना गंभीर असे आजार आहेत अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.
लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे
Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
