एक्स्प्लोर

Coronavirus Today : देशात 24 तासांत 32,906 नवे कोरोनाबाधित, तर 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus Today : देशात 24 तासांत 32,906 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

Coronavirus Today : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक घट होताना दिसत आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32 हजार 906 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत 4 लाख 10 हजार 784 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच, काल दिवसभरात 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशातील सध्याची कोरोनास्थिती : 

आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 9 लाख 7 हजार 282
एकूण कोरोनामुक्तांचा आकडा : तीन कोटी 63 हजार 720
सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा : 4 लाख 32 हजार 778 
आतापर्यंतचे एकूण मृत्यू :  4 लाख 10 हजार 784

देशातील लसीकरणाची परिस्थिती

देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 38 कोटी 14 लाख 67 हजार 646 हून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 40 लाख 65 हजार 862 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 30,66,12,781 लोकांना पहिला लसीचा डोस, तर 7,48,54,865 लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरु केल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील 11,41,34,915 नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर 38,88,828 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, तमिलनाडु, बिहार, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 

राज्यात सोमवारी 15, 277 रुग्णांना डिस्चार्ज, 7,603 रुग्णांची भर

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. काल  7, 603 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे. 

राज्यात काल 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (71), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63)  या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

परभणी, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1640 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,41,86,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,65, 402 (13.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,82,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 701 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,120 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 926 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget