Coronavirus India Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावला; 24 तासांत 18 हजार 132 रुग्णांची नोंद, तर 193 रुग्णांचा मृत्यू
India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 18 हजार 132 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावात आता घट होताना पाहायला मिळत आहे. देशात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा मंदावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 18 हजार 132 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. अशातच 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (रविवारी) देशात 18 हजार 166 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जाणून घेऊया देशातील कोरोनाबाधितांची सध्याची स्थिती.
आतापर्यंत 4 लाख 50 हजार 782 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी आकडेवारीनुसार, देशांत गेल्या 24 तासांत 21 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 27 हजार 347 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 32 लाख 93 हजार 478 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल दिवसभरात 79 लाखांहून अधिक डोस
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (रविवारी) कोरोना व्हायरस लसीच्या 46 लाख 57 हजार 679 लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर लसीच्या डोसच्या आकडा वाढून आता 95 कोटी 19 लाख 84 हजार 373 वर पोहोचली आहे.
राज्यात काल (रविवारी) दिवसभरात 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित
राज्यात दिवसभारातील कोरोनाबाधितांची संख्या काल (रविवारी) कोरोनामधून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. काल (रविवारी) दिवसभरात राज्यात 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 1 हजार 823 जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, 28 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64,01,287 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.32 टक्के एवढे झाले आहे.