(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus India Updates : देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 4120 मृत्यू तर 3.62 लाख नव्या रुग्णांची भर
देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 3.62 लाख नवीन रुग्णांची भर पडली असून 4120 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.09 टक्के इतकं झालं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3,62,727 नवीन रुग्णसंख्येची भर पडली असून 4,120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी देशात 3.48 लाख नवीन रुग्णांची भर पडली होती तर 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 1.09 टक्के इतकं झालं आहे तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 83 टक्के झालं आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 37 लाख 03 हजार 665
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 97 लाख 34 हजार 823
- एकूण सक्रिय रुग्ण : 37 लाख 04 हजार 099
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 54 हजार 197
- देशातील एकूण लसीकरण : 17 कोटी 72 लाख 14 हजार 256
देशात आतापर्यंत 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 18 लाख 94 हजार 991 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.4 टक्के एवढा आहे.
राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा; ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांचा सल्ला
- केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं; अनुपम खेर यांचा मोदी सरकारवर निशाणा
- अकरावी CET प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम निर्णय लवकरच; शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द