Coronavirus India Updates : गेल्या 24 तासात देशात 2.08 लाख नव्या रुग्णांची भर तर 4157 जणांचा मृत्यू
Coronavirus India Updates : जगात दररोज भर पडणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण हे केवळ भारतातील आहेत तर प्रत्येकी तिसरा मृत्यूही भारतात होतोय.
नवी दिल्ली : रविवारी देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर सोमवारी पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 2,8,921 कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 4157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 2,95,955 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात देशातील सक्रिय रुग्णसंख्येत 91,191 रुग्णांची घट झाली आहे. या आधी सोमवारी देशात 1.96 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर क3511 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 71 लाख 57 हजार 795
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 43 लाख 50 हजार 816
- एकूण सक्रिय रुग्ण : 24 लाख 95 हजार 591
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 3 लाख 11 हजार 388
देशात 25 मेपर्यंत 20 कोटी 6 लाख 62 हजार 456 कोरोना डोस देण्यात आले आहेत तर आतापर्यंत 33 कोटी 48 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यू दर हा 1.14 टक्के इतका आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 89 टक्के इतकं आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात सोमवारी 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 36,176 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी राज्यात 601 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा दैनंदिन आकडेवारीत, रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात एकूण 3,14,368 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 52,18,768 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि 'नौटंकी दौरा', भाजप नेते नारायण राणेंचा प्रहार
- Buddha Purnima : बुद्धांचं आयुष्य हे दीपस्तंभासारखं, मानवतेवर विश्वास असलेल्यांनी एकत्र यावं; पंतप्रधान मोदींचं आवाहन
- केंद्र सरकारच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, नव्या नियमावलीमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं मत