Coronavirus Cases India : देशात मागील 54 दिवसांतील सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद; पाहा नेमका आकडा
मागील काही दिवसांपासून सातत्यानं देशात नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Coronavirus Cases India : देशात मागील बऱ्याच काळापासून कोरोना रुग्णांमध्ये सुरु असणारी घट आजही पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवलेला असताना आता मात्र देशातील नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. 13 एप्रिलला देशातील कोरोना रग्णांचा आकडा इतका कमी होता. ज्यानंतर तब्बल दिवसांनंतर हा आकडा पुन्हा दिसला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 2795 नागरिकांचा मृत्यू झाला. तर, 2 लाख 55 हजार 287 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली.
देशातील एकूण कोरोना आकडेवारी
एकूण कोरोना रुग्ण - 2 कोटी 81 लाख 75 हजार 44
कोरोना मुक्त झालेले रुग्ण - 2 कोटी 59 लाख 47 हजार 629
एकूण सक्रिय रुग्ण - 18 लाख 95 हजार 520
एकूण मृत्यू - 3 लाख 31 हजार 895
Covid19 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्या मुलांना 'फ्लू'ची लस देणं का महत्वाचं आहे?
देशात मागील 24 तासांत कोरोनाच्या 27 लाख 80 हजार 58 लसी देण्यात आल्या. ज्यानंतर लसीकरणाचा एकूण आकडा 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 वर पोहोचला आहे. एकिकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असतानाच देशात कोरोना चाचण्यांचा वेगही मंदावलेला नाही. त्यामुळं एकंदर आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्याचं चित्र दिसत आहे.
India reports 1,27,510 new #COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
— ANI (@ANI) June 1, 2021
Total cases: 2,81,75,044
Total discharges: 2,59,47,629
Death toll: 3,31,895
Active cases: 18,95,520
Total vaccination: 21,60,46,638 pic.twitter.com/AgS0JDgEGH
महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा वेग नियंत्रणात येत असल्याचं पाहून काही जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे.