एक्स्प्लोर

Covid19 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्या मुलांना 'फ्लू'ची लस देणं का महत्वाचं आहे? 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना बालकांना इन्फ्लूएंझा फ्लूची लस द्यावी अशी शिफारस महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेल्या पेडियाट्रिक टास्कफोर्सने केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होईल असं त्यांनी सांगितलं आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बालकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तशा पद्धतीच्या शक्यता आतापर्यंत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण बालकांना अत्यंत कमी प्रमाणात होतेय किंवा त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते असं समजलं जायचं. पण गेल्या काही दिवसांत लहान बालकांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. 

मुलुंड येथील डॉ. जेसल सेठ यांनी सांगितलं की, "कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 60 वर्षावरील वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वयोगटातील लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे प्रौढ वयोगटातील बहुतांश लोकांना एक तर कोरोना होऊन गेला आहे किंवा त्यांनी कोरोनाच्या एक किंवा दोन्ही लसी घेतल्या आहेत. त्यामुळे देशात तिसरी लाट येण्याची शक्यता असताना त्याचा फटका हा बालकांना मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेदरम्यान बालकांमध्ये तीव्र प्रकारचा ताप किंवा लक्षणं दिसू नयेत याकडे आता वैद्यकीय तज्ज्ञांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे."

फ्लूची लस द्या
पाच वर्षाच्या आतील मुलांना फ्लूची लस द्यावी अशी शिफारस इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सने या आधीच केली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झालंय की, ज्या मुलांना इन्फ्लूएंझा फ्लूची लस देण्यात आली आहे त्या मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात झाला आहे. 

फ्लूची लस बालकांमध्ये कोरोनाची तीव्रता कशी कमी करते?
कोविड 19 आणि इन्फ्लुएंझा या दोन्हीमध्ये काही समान लक्षणं दिसून येतात. जर कोरोनाच्या या लाटेमध्ये इन्फ्लुएंझाची साथ आल्यास या महामारीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर बालकांना फ्लूची लस आधीच दिली तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा दुसऱ्या लाटेप्रमाणे बसणार नाही, या लसीमुळे बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 

बालकांना फ्लूची लस दिल्यास आरोग्य यंत्रणवरचा ताण कमी होईल तसेच आता ज्या प्रमाणात चाचण्या कराव्या लागतात त्या प्रमाणातही घट होईल. महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेल्या पेडियाट्रिक टास्कफोर्सनेही या फ्लूच्या डोसची शिफारस केली आहे. त्यांच्या मते, हा डोस जर बालकांना दिला तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका कमी प्रमाणात बसेल.

कोरोना आणि फ्लू अशा दोन्ही लसी घेऊ शकतो का? 
कोरोनाची लस आणि फ्लूची लस या दोन्ही लसी वेगवेगळ्या आहेत. या दोन लसींमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे बालकांच्या शरीरात अॅन्टिबॉडी तयार होऊ शकतील आणि त्यांचं शरीर कोरानाविरोधात लढण्यासाठी सज्ज होईल.  

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
Salary Increment : दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

व्हिडीओ

Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
Embed widget