Coronavirus In Karnataka: कर्नाटकासमोर नवे संकट, कोविडच्या 'ए व्हाय 4.2' प्रकाराचे 7 रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ
Coronavirus In Karnataka: कोरोनाच्या नवा प्रकार ए व्हाय 4.2 यूके, रशिया आणि चीनमध्ये थैमान घालत आहे. यामुळे 130 हून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतासाठी चिंतेची बाब आहे.
Coronavirus In Karnataka: कर्नाटकमधील रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले. यातच राज्यातील नागरिकांना चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली. राज्यात कोरोनाचे नवा प्रकार ए व्हाय 4. 2 (AY 4.2 Strain) पाय पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात आतापर्यंत जणांना नव्या 'एव्हाय 4.2' कोविड-19 प्रकाराची संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कर्नाटकमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या 'ए व्हाय 4.2' या नव्या प्रकारामुळे राज्यात चिंता परसली आहे. 'ए व्हाय 4.2' प्रकारचे राज्यात आतापर्यंत 7 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 रुग्ण बंगळरू आणि इतर रुग्ण राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री बसवराज मोम्मई म्हणाले की, कोरोनाच्या या नव्या प्रकाराबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी कठोर उपायोजना आखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकारावर तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या एव्हाय 4.2 नव्या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हे सर्वात प्रभावी प्रतिबंधक आहे. ज्या लोकांनी कोरोनाचा केवळ पहिला डोस घेतला आहे, त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. याचबरोबर सोशल डिस्टंसिन्ग, वारंवार हात धुणे आणि तोंडावर मास्क लावणे अधिक महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करणे, घातक ठरू शकते.
महत्वाचे म्हणजे, राज्यात कोरोन रुग्णांच्या संख्येत घट होताच अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर मॉल्स, चित्रपटगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी दिसून आली. मात्र, कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कर्नाटकर सरकार राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करू शकते. दरम्यान, राज्यातील सात जिल्ह्यांनी लक्ष्य लोकसंख्येच्या 50 टक्के दुसऱ्या कोविड डोससह लसीकरण केले.
संबंधित बातम्या-