Coronavirus Cases Today in India : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; 58 हजारांहून अधिक रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 2100 वर
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2135 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घ्या देशाची कोरोनाची सध्याची स्थिती...
आतापर्यंत 4 लाख 82 हजार 551 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 रुग्ण ठिक झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 147 कोटींहून अधिक लसीचे डोस
देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या लसीचे 147 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (मंगळवारी) 96 लाख 43 हजार 238 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीचे 147 कोटी 72 लाख 8 हजार 846 डोस देण्यात आले आहेत.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 2135 रुग्ण
देशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या 2135 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात या व्हेरियंटचे 24 राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 653, दिल्लीत 464 आणि केरळात 185 रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे.
पाहा ओमायक्रॉनबाधितांची संपूर्ण यादी :
राज्यात तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लावले जाणार
संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपली आहे. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Corona Restriction : मुंबईची चिंता वाढली; दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, लवकरच लॉकडाऊन?
- Mumbai Corona Update : रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, पण लक्षणं नसलेल्यांची संख्या अधिक, पालिकेची रुग्णव्यवस्था सज्ज
- ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह