Coronavirus Cases India : चिंताजनक! कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 3688 नवे कोरोनाबाधित, 50 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3688 नवे कोरोनाबाधित आढळले असून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3688 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी दिवसभरात 2755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3377 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 60 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 2755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 803 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 22 हजार 377 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 96 हजार 640 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 22 लाख 58 हजार 59 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 188 कोटी 89 लाख 90 हजार 935 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल आजचे दर काय? जाणून घ्या...
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Netflix : 10 वर्षात पहिल्यांदा नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी घट, तोट्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया