एक्स्प्लोर

Netflix : 10 वर्षात पहिल्यांदा नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी घट, तोट्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ

Netflix Reported Massive Subscriber Loss : नेटफ्लिक्स (Netflix) जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आहे. अनेक लोक चित्रपट किंवा वेब सीरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्स वापरणे पसंत करतात.

Netflix Reported Massive Subscriber Loss : नेटफ्लिक्सने (Netflix) मार्केटिंग-संबंधित अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. कोरोनाकाळात नेटफ्लिक्सचे सब्सक्राइबर्स (Netflix Subscription) सर्वाधिक वाढले. कोरोनाकाळात कंपनीचे सब्सक्राइबर्समध्ये कमालीची वाढ झाली होती. मात्र, 2022 या वर्षाची सुरुवात नेटफ्लिक्ससाठी फारशी चांगली झालेली नाही. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातील नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी घट झाली आहे. ही घट दशकातील मोठी घट आहे. अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने अलीकडेच एका अहवालात नोंदवलं आहे की, 2022 च्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सने सुमारे दोन लाख सब्सक्राइबर्स आणि तिसऱ्या तिमाहीत दोन दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स गमावले आहेत.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेही कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे कंपनीने सात लाखपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स गमावले. युजर्समधील पासवर्ड शेअरिंगही या नुकसानाचे एक कारण असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या पेड सबस्क्रिप्शनमध्ये फारशी वाढ झालेली नाही. या व्यतिरिक्त नेटफ्लिक्सला डिस्ने प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या इतर OTT प्लॅटफॉर्मसोबत कठोर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

नेटफ्लिक्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण 
मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर शेअर बाजारातील किंमत सुमारे 40 अब्ज डॉलरने (सुमारे 3,05,320 कोटी रुपये) कमी झाली. कंपनीने अमेरिकेसह कॅनडामधील सुमारे सहा लाख सब्सक्राइबर्स गमावले. जानेवारीमध्ये कंपनीने दोन वर्षांत पहिल्यांदा मासिक सबस्क्रिप्शनमध्ये दरवाढ केली. कंपनीने सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगभरात नेटफ्लिक्सचे 222 दशलक्ष सब्सक्राइबर्स आहेत. याव्यतिरिक्त, 100 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर्स त्यांची खाते एकमेकांसोबत शेअर करतात.

नेटफ्लिक्सचे कंपनीच्या मते, पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीला अधिक तोटा सहन करावा लागत आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने अनेक देशांमध्ये आपल्या मासिक प्लॅनच्या किमतीही कमी केल्या होत्या. तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने काही देशांमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅनच्या ​​किंमतीतही वाढ केली होती. मात्र यामुळे कंपनीचे अधिक नुकसान झाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget