(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases : कोरोना प्रादुर्भावात घट; गेल्या 24 तासांत देशात 6561 रुग्णांची नोंद, 142 मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 6 हजार 561 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 142 रुग्णांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 6 हजार 561 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 142 रुग्णांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. काल (बुधवारी) 7554 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, कालच्या तुलनेत देशात आज कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) देशात 14 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 77 हजार 152 सक्रिय रुग्ण आहेत. या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 5 लाख 14 हजार 388 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 53 हजार 620 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
23 महिन्यांनी महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. काल (बुधवारी) राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जवळपास दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 544 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 007 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात काल (बुधवारी) 38 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात काल (बुधवारी) 38 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4771 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 102 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
महाराष्ट्राचा मृत्यूदर 1.82 टक्क्यांवर
राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे. सध्या राज्यात 45 हजार 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 660 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 3 हजार 848 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :