Coronavirus : चांगली बातमी! कोरोनाचा आलेख घसरला, 5554 नवे कोरोनाबाधित
India Corona Update : देशातील कोरोनाचा आलेख घसरला आहे. गेल्या 24 तासांत 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Cases Today : देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. यानंतर काही दिवसांनंतरच नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे. देशातील कोरोनाचा आलेख घसरला आहे. गेल्या 24 तासांत 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत 539 रुग्णांची घट झाली आहे. तर कोरोनाबळीही घटले आहेत. देशात गुरुवारी दिवसभरात 6093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच यंदा दोन वर्षानंतर मोठ्या थाटामाटात पार पडला. कोरोनाचा आलेख असाच घटता राहिल्यास यंदाचा नवरात्रौत्सवही उत्साहात पार पडण्याची शक्यता आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 6 हजार 322 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 139 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 48 हजार 850 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या नव्या 251 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,25,780 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,717 झाली आहे. सध्या मुंबईत 2,085 रुग्ण आहेत.
#COVID19 | India reports 5,554 fresh cases and 6,322 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 10, 2022
Active cases 48,850
Daily positivity rate 1.47% pic.twitter.com/BKyz7sbiNl
महाराष्ट्रात 955 नव्या रुग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 955 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत राज्यात 972 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 972 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,54,052 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


















