(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावतोय; 24 तासांत 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद, 470 मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 919 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 470 रुग्णांचा मृत्यू झालाय.
Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 919 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 28 हजार 762 इतकी आहे. जाणून घ्या देशातील सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 64 हजार 623 मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 242 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांचा आकडा वाढून 4 लाख 64 हजार 623 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, अद्याप एकूण 3 कोटी 38 लाख 85 हजार 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीचे 114 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 73 लाख 44 हजार 739 लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 114 कोटी 46 लाख 32 हजार 851 डोस देण्यात आले आहेत.
राज्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्यावर, तर 32 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (बुधवारी) 1003 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1052 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 70 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात काल (बुधवारी) 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 766 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1 लाख 517 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1056 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 42 , 67, 353 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत काल (बुधवारी) 275 रुग्णांची भर तर दोन जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 275 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 256 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2821 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,38,599 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2098 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :