BJP Foundation Day : आज भाजपचा 42वा स्थापना दिवस, बहुमताच्या सरकारमधून काढल्यानंतर दोन दिवसात वाजपेयी-अडवाणींनी केली भाजपची स्थापना
BJP Foundation Day 2022 : भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा जिंकणारा भाजप आज केंद्रात स्वबळावर बहुमताने राज्य करत आहे.
BJP Foundation Day 2022 : भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच भाजपचा आज 41 वा स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला 1984 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. भाजपने 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये त्यांच्या जागांची संख्या 300 च्या पुढे गेली.
कशी झाली भाजपची स्थापना?
केवळ 3 मतांमुळे बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली. अडवाणींनी भाजपची स्थापना कशी झाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की, '1980 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातील संघविरोधी मोहिमेने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. याचा काँग्रेसला स्पष्टपणे फायदा झाला आणि निवडणुकीत जनता पक्षाची कामगिरी खालावण्याचा प्रयत्न झाला.
एप्रिलमध्ये नवी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय होणार होता. परंतु जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने 17 ने तडजोडीचा फॉर्म्युला फेटाळून लावला. 14 च्या बाजूने मतदान झाले आणि माजी जनसंघ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी
देशातील सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजपचा आज स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरात तयारी सुरू आहे. स्थापना दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. भाजप नेते अरूण सिंह यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली आहे.
स्थापना दिनाच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना अरूण सिंह म्हणाले, देशातील भाजपच्या सर्व शाखेच्या कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येईल. कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, आमदार सहभागी होणार आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात भाजप अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यातच आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- BJP Foundation day: भाजपचा 6 एप्रिलला स्थापना दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ
- Elon Musk : टेस्लाच्या एलन मस्कने ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर पोल घेत विचारला प्रश्न, एडिट फिचरबाबत मांडा मत
- SECL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्ये कुठे करता येणार अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha