Coronavirus Cases Today : देशात कोरोनाचा आलेख पुन्हा वाढता; गेल्या 24 तासांत 1 लाख 72 हजार 433 कोरोनाबाधित, 1008 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1008 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus Cases Today in India : आज देशात प्राणघातक कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1008 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 15 लाख 33 हजार 921 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 लाख 33 हजार 921 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 98 हजार 983 झाली आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात दोन लाख 81 हजार 109 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 97 लाख 70 हजार 414 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
कर्नाटक-तामिळनाडूमध्ये कहर सुरूच
कर्नाटकात गेल्या 24 तासांत 20 हजार 505 नवीन रुग्ण आढळले असून 40 हजार 903 रुग्ण बरे झाले असून 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 77 हजार 244 इतकी झाली आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत 14 हजार 13 नवीन रुग्ण आढळले असून 24 हजार 576 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 77 हजार 999 झाली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले आहे की बुधवारी दिवसभरात भारतात कोरोना विषाणूसाठी 15 लाख 69 हजार 449 नमुने तपासण्यात आले होते, त्यानंतर कालपर्यंत एकूण 73 कोटी 41 लाख 92 हजार 614 नमुने तपासण्यात आले आहेत.
आतापर्यंत 167 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 167 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधाक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 55 लाख 10 हजार 693 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 167 कोटी 87 लाख 93 हजार 137 डोस देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- शाळेत मुलांची हजेरी आवश्यक आहे की नाही हा निर्णय राज्यांचा : केंद्र सरकार
- UP Election : भाजप विरोधात संयुक्त किसान मोर्चाचं 'मिशन उत्तर प्रदेश', दिल्लीत होणार पत्रकार परिषद
- INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, आयएनएस वागीर पानबुडीची समुद्री चाचणी सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha