Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 66 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या 54,118 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 9,620 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यासह, बरे झालेल्या लोकांची संख्या 4,23,98,095 झाली आहे. कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.71 टक्के आहे. आतापर्यंत 77.34 कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 6,12,926 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात देशात 9 हजार 620 कोरोनातून लोक बरे झाले होते, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 54 हजार 118 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 102 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 98 हजार 95 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आणखी 23 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या 7,08,479 वर पोहोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही नवीन प्रकरणे समोर आली आहेत. मृतांची संख्या 11,877 आहे. ठाण्यात कोविड-19 मृत्यू दर 1.67 टक्के आहे. दुसर्या अधिकाऱ्याने सांगितले की, शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड-19 चे रुग्ण 1,63,423 वर पोहोचले आहेत तर मृतांची संख्या 3,392 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- Petrol-Diesel Price : देशात निवडणुकांचे वारे थांबरणार, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची धास्ती, उच्चांक गाठणार?
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान, 54 जागांवर 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
- ITA Awards मध्ये 'एबीपी'ची बाजी, सर्वाधिक लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीसाठी पुरस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha