Coronavirus : देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, सक्रिय रुग्णांचा आकडाही घसरला
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
![Coronavirus : देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, सक्रिय रुग्णांचा आकडाही घसरला coronavirus cases in india today 2202 new cases of covid 27 deaths recorded in the last 24 hour Coronavirus : देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, सक्रिय रुग्णांचा आकडाही घसरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/9b61312c578ad8a6a59fee553eff65c4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2 हजार 487 नवीन कोरोना रुग्ण आणि 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत भारतात पाच लाखहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाची नवी आकडेवारी जारी केली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 550 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यासह देशाता आतापर्यंत कोरोना संसर्गावर मात केलेल्यांची संख्या 4 कोटा 25 लाख 82 हजार 243 वर पोहोचली आहे. तसेच नव्या 27 कोरोनाबळींसह मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 5 लाख 24 हजार 241 इतकी झाला आहे. देशात सध्या 17 हजार 317 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 16, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/Ho7UdVtv6O pic.twitter.com/aNplyJtaA7
ठाणे जिल्ह्यात 31 नवे कोरोनाबाधित
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 31 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ठाण्यात आतापर्यंत 7 लाख 9 हजार 368 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 11 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 400 च्या खाली
तामिळनाडूमध्ये रविवारी दिवसभरात 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 34 लाख 54 हजार 621 झाली आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडूमध्ये एकाही कोरोनारुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तामिळनाडूमध्ये सध्या 359 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)