Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोंद, 83 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1335 रुग्णांची नोंद झाली होती.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1335 रुग्णांची नोंद आणि 52 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 445
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 404 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 445 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 21 हजार 264 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 92 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 27 हजार 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 18 लाख 38 हजार 552 डोस देण्यात आले. आतापर्यंत कोरोना लसीचे 184 कोटी 52 लाख 44 हजार 856 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 69 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक ( 2 कोटी 33 लाख 27 हजार 952) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Supreme Court : अबब! केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित 35000 हून अधिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha