एक्स्प्लोर

Black Fungus : देशात ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ तर बाजारातून इंजेक्शन गायब

देशात कोरोनासोबत आता ब्लॅक फंगसच्या (Black Fungus) रुग्णांमध्ये वाढ होत असून त्यावर वापरण्यात येणारे इंजेक्शन Liposomal amphotericine B बाजारात उपलब्ध होत नसून त्याचा  तुटवडा निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नाही, मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वेगाने वाढ होत आहे. अशातच त्यावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या Liposomal amphotericine B इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा बिकट होत चालल्याचं दिसून येतंय. 

महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे जवळपास दोन हजारांवर रुग्ण सापडले असून गुजरातमध्ये हा आकडा एक हजार 163 इतका आहे. मध्य प्रदेशमध्ये 281 रुग्ण तर 27 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, तेलंगना, ओडिशा या राज्यातही ब्लॅक फंगसचे रुग्ण सापडत आहेत. 

Liposomal amphotericine B इंजेक्शनची कमतरता
एकीकडे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असताना दुसरीकडे यावरील मिळणाऱ्या Liposomal amphotericine B इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला त्या पद्धतीनेच आता ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितलंय की या आधी यावरच्या इंजेक्शनची मागणी जास्त नव्हती. त्यामुळे त्याचे उत्पादनही अत्यंत कमी प्रमाणात केलं जायचं. आता अचानक एवढी मागणी वाढली आहे की त्या प्रमाणात सध्या पुरवठा होत नाही. त्यामुळे याचा साठेबाजार होत असून ते बाजारातून गायब झाले आहे. 

कोरोना रुग्ण आणि त्यातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून Black Fungus चा संसर्ग, ज्याला Mucormycosis असंही म्हटलं जात, त्याचा धोका वाढत आहे. यावर आयसीएमआरने सुचना जारी केली असून त्यात सांगण्यात आलंय की अनियंत्रित मधुमेह आणि उपचाराच्या दरम्यान आयसीयूमध्ये जास्त काळ राहिलेल्या कोरोना रुग्णांवर Black Fungus म्हणजेच Mucormycosis चा उपचार वेळेवर झाला नसल्यास ते धोकादायक ठरु शकतं. 

कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकांमध्ये ब्लॅक फंगसचा आजार होत असल्याचं समोर आलं आहे. खासकरून, ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांना या आजाराची लागण होत असल्याचं दिसून येतंय. 

काय आहे  ब्लॅक फंगस? 
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.  सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते.  कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे. चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget