एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांच्या अडणीत वाढ; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा जबाब नोंदवणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबईतील कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात जबाब नोंदवला जाणार आहे.

अकोला : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांसंदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सध्या चौकशी सुरु आहे. त्यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जबाब मुंबईतील मुख्यालयात आज नोंदवण्यात येणार आहे. घाडगे सध्या अकोल्यात जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह यांच्यासह 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात अकोल्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबईतील कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी भीमराव घाडगे आज मुंबईत आले आहेत. घाडगे सध्या अकोल्यात जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरूनच परमबीर सिंह यांच्यासह 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात अकोल्यातील सीटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांत अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. घाडगेंच्या आजच्या जबाबानंतर परमबीर सिंह यांच्याभोवतीचे फास आणखी आवळले जाण्याची शक्यता आहे. आजच्या जबाबात घाडगे परमबीर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती आणि दस्तावेज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात 27 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, परमबीर सिंह हे 2015 ते 2018 याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला होता.

पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार, परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे मुलाच्या सिंगापूरमधील व्यवसायात गुंतवले असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget