एक्स्प्लोर

दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल, तर मालदीवमध्ये अडकलेले 750 जण भारताच्या दिशेने रवाना

दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल झालं तर मालदीवमध्ये अडकलेले 750 भारतीय कामगार जलाश्म युद्धनौकेतून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकटात परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परतले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने 182 भारतीय कोची विमानतळावर पोहोचली आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबई विमानतळावरून पहिलं विमान काल (गुरुवारी) संध्याकाळी रवाना झालं असून रात्री उशीरा कोची विमानतळावर दाखल झालं आहे. 182 लोकांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे. परदेशातून परतलेल्या भारतीयांसाठी विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विमानतळावर सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. येणाऱ्या लोकांचं थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, पाच लहान बाळं आणि 177 प्रौढ प्रवाशांना घेऊन एक विमान रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी कोची आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, एवढ्याच प्रवाशांसह आणखी एक विमान 10 वाजून 32 मिनिटांनी दुबईहून कोझिकोड येथे पोहोचलं आहे.

जवळपास एक आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या अभियानामध्ये सध्या 64 उड्डानं आणि काही नौदलाच्या युद्धनौकांमार्फत परदेशातील भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहेत. एका आठवड्यात 64 उड्डानांमार्फत देशातील 14.5 हजारांहून अधिक भारतीय घरी परतणार आहेत. सर्वात जास्त 15 फ्लाइट्स केरळमध्ये जाणार आहेत. तर दिल्ली-एनसीआर आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी 11, तेलंगाणा 7 आणि गुजरातमध्ये 5 फ्लाइट्स पाठवण्यात येणार आहेत.

गृह मंत्रालयाने सांगितले की, परदेशात विमानाच्या उड्डानाआधी प्रवाशांचं मेडिकल स्क्रिनिंग केलं जाणार आहे. ज्या भारतीयांमध्ये खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणं असतील. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच भारतात आल्यानंतर या लोकांना 14 दिवसांसाठी रूग्णालयात किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

मालदीव मार्गे परतणार भारतीय

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु करण्यात आलं आहे. अशातच मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतूच्या नावाने दोन नौदलातील युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात INS जलाश्वतून जवळपास 750 भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येणार आहे. जवळपास 900 किमीचा प्रवास करून हे जहाज कोची बंदरात दाखल होणार आहे. येथे या नागरिकांना उतरवल्यानंतर त्यांच्या राज्यांतील जिल्ह्यांत पोहोचवण्यात येणार आहे.

या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच, जवळपास 3 हजार 26 रुपयांचं सेवा शुल्क आकारण्यात आलं आहे. 40 डॉलर प्रवास शुल्क न म्हणता, सेवा शुल्क म्हणण्याचं कारण म्हणजे, इतर वेळी मालदीव वरून कोचीला येण्याऱ्या लग्जरी क्रूज शिप्स सरासरी 32 हजार रुपयांचं प्रवास शुल्क आकारण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget