Coronavirus : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; एकूण बाधितांपैकी 84 टक्के रुग्ण 'या' 8 राज्यांत
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. भारतात 6 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या एका दिवसांत महाराष्ट्रात 40 हजार 414 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांसह आठ राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका दिवसात समोर आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत 68 हजार 020 रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या राज्यांमधील आहेत.
भारतात सहा कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. मंत्रालयाने सांगितलं की, भारतात 6 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या एका दिवसांत महाराष्ट्रात 40 हजार 414 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्नाटकात 3 हजार 082, पंजाबमध्ये 2 हजार 870, मध्य प्रदेशात 2 हजार 276, केरळमध्ये 2 हजार 216, तामिळनाडूमध्ये 2 हजार 194 आणि छत्तीसगढमध्ये 2 हजार 153 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, देशात गेल्या एका दिवसात समोर आलेल्या 68 हजार 020 कोरोना बाधितांपैकी 84.5 टक्के रुग्ण हे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ राज्यांमधील आहेत.
सध्या 5 लाख 21 हजार 808 रुग्णांवर उपचार सुरु
देशात सध्या 5 लाख 21 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 80.17 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि छत्तीसगढमधील आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या सहा कोटींहून अधिक झाली आहे. सकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 9,92,483 सत्रांमध्ये लसीचे 6,05,30,435 डोस देण्यात आले आहेत. यापैकी 81,56,997 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, 51,78,065 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून तैनात असलेल्या 89,12,113 कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 36,92,136 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्यापासून इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या 67,31,223 लाभार्थ्यांच्या वतीने 2,78,59,901 ज्येष्ठ नागरिकांनाही लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :