एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 394 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 6817

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6817 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 394 ने वाढला असून मुंबईत 242 रुग्ण आढळले आहे. तर दिवसभरात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 394 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6817 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईचे तर पुण्यातील पाच आणि मालेगाव येथील दोन रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 301 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 117 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8814 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 12 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील नऊ जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 6 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे. महाराष्ट्र एकूण रूग्ण – 6817 मृत्यू - 301 मुंबई महानगरपालिका- 4447 (मृत्यू 178) ठाणे- 35(मृत्यू 2 ) ठाणे महानगरपालिका- 220 (मृत्यू 4) नवी मुंबई मनपा- 125(मृत्यू 4) कल्याण डोंबिवली- 131 (मृत्यू 3) उल्हासनगर मनपा - 2 भिवंडी, निजामपूर - 12 मिरा-भाईंदर- 118 (मृत्यू 2) पालघर- 21 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 114 (मृत्यू 3) रायगड- 14 पनवेल- 40 (मृत्यू 1) नाशिक - 4 नाशिक मनपा- 7 मालेगाव मनपा - 116 (मृत्यू 11) अहमदनगर- 25 (मृत्यू 2) अहमदनगर मनपा - 8 धुळे -6 (मृत्यू 1) धुळे मनपा - 16 (मृत्यू 1) जळगाव- 6 (मृत्यू 1) जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1) नंदुरबार - 7 (मृत्यू 1) पुणे- 43 (मृत्यू 2) पुणे मनपा- 848 (मृत्यू 63) पिंपरी-चिंचवड मनपा- 70 (मृत्यू 2) सातारा- 20 (मृत्यू 2) सोलापूर- 1 सोलापूर मनपा- 38 (मृत्यू 3) कोल्हापूर- 7 कोल्हापूर मनपा- 3 सांगली- 25 सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1) सिंधुदुर्ग- 1 रत्नागिरी- 8 (मृत्यू 1) औरंगाबाद मनपा- 42 (मृत्यू 5) जालना- 2 हिंगोली- 7 परभणी मनपा- 1 लातूर -9 उस्मानाबाद-3 बीड - 1 नांदेड मनपा - 1 अकोला - 11 (मृत्यू 1) अकोला मनपा- 12 अमरावती मनपा- 13 (मृत्यू 1) यवतमाळ- 23 बुलढाणा - 21 (मृत्यू 1) वाशिम - 1 नागपूर- 2 नागपूर मनपा - 99 (मृत्यू 1) चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7702 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 28.88 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. Dr Shekhar Mande | कोरोना व्हायरसविरोधात कशा प्रकारे संशोधन सुरू आहे? डॉ. शेखर मांडेंशी संवाद

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget