कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स; Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर
कोविशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोनावर देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये आता 6 ते 8 आठवड्यांच्या अंतर असणार आहे. या आधी पहिल्या डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांच्या आत घेतला जायचा, परंतू आता या डोसमधील अंतर वाढविण्यात आलं आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन (NTAGI) आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावावर ड्रायव्हर, मोलकरणीला दिली लस, औरंगाबाद कोव्हिड लसीकरण मोहिमेत बनवाबनवी
कोविशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की, त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना द्याव्यात. जेणेकरून लसीकरणाच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडणार नाही आणि लसीकरणाचा हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल.
भारतात आपत्कालीन वापरासाठी दोन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. एक आहे भारत बायोटेकची कोवाक्सिन आहे आणि दुसरी म्हणजे अॅस्ट्रोजेनिका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड. भारतात सुरू असलेल्या लसीकरणात या दोन्ही लस दिल्या जात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 4,50,65,998 पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत, कोरोना लसीचा पहिला डोस भारतातील 77,86,205 आरोग्य सेवा आणि 80,95,711 फ्रंटलाईन कर्मचारी यांना देण्यात आला आहे. त्याच वेळी, 48,81,954 आरोग्य सेवा आणि 26,09,742 फ्रंटलाईन कामगारांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 37,21,455 लाभार्थ्यांना आणि 60 वर्षांवरील 1,79,70,931 लाभार्थ्यांना देखील पहिला डोस देण्यात आला आहे.
Covid Vaccine | कोणतीही लस घ्या, राजकारण कशासाठी? कोणती लस किती प्रभावी यावरून नवा वाद?