(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination : 21 टक्के लोकांची खासगी तर 35 टक्के लोकांची सरकारी रुग्णालयात लसीकरणाची इच्छा : सर्वे
कोरोनाची लस घेण्याची इच्छा असलेले 63 टक्के लोक लसीच्या दोन डोससाठी 600 रुपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास उत्सुक नाहीत, अशीही माहिती या सर्वेतून समोर आली आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने देशभरातील सुमारे 24000 खासगी रुग्णालयांना 1 मार्च 2021 पासून कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. 1 मार्चपासून 60 वर्षे वयापेक्षा जास्त व एखाद्या आजाराने ग्रस्त 45 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लसी दिली जाईल. खासगी रुग्णालयांकरिता सरकारने लसीची पहिली किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. त्याचबरोबर, सरकारी रूग्णालयात कोणत्याही प्रकारचा खर्च न करता लसीकरण सुरू राहील.
सरकारने खासगी रुग्णालयांना 60 वर्षांपेक्षा जास्त आणि एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या 45 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्याची परवानगी दिल्यानंतर स्थानिक पातळीवर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये किती लोक खाजगी रुग्णालयात लसीकरण करू इच्छितात आणि किती रुपये लसीसाठी देऊ इच्छितात, हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण भारतातील 266 जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून त्यात 1600 लोक सहभागी झाले होते.
Corona Vaccination : ऑनलाईल नोंदणी केली नसेल तर कोरोनाची लस मिळणार का?
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 35 टक्के लोकांना सरकारी केंद्रात लस द्यावी असं वाटतं. तर 21 टक्के लोक असे म्हणतात की त्यांना खाजगी रुग्णालयात लस देण्यात यावी. 27 टक्के लोक म्हणाले की, कुठून लस मिळावी याबाबत अद्याप काही विचार केला नाही.
Mumbai Corona Update | मुंबईमधील चाळी, झोपडपट्ट्यांची वाटचाल कन्टेन्मेंट झोन मुक्तीकडे
लसीच्या किमतीबद्दल दोन डोससाठी 17 टक्के लोकांनी 200 रुपये किंमत सांगितली. 22 टक्के लोकांनी 300 रुपये किंमत सांगितली. 24 टक्के लोक 600 रुपयांपर्यंत, 16 टक्के लोक 1000 रुपयांपर्यंत पैसे देऊ इच्छितात. तर 6 टक्के लोक काहीही सांगू शकले नाहीत. याचा अर्थ असा आहे की, लस घेण्याची इच्छा असलेले 63 टक्के लोक लसीच्या दोन डोससाठी 600 रुपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास उत्सुक नाहीत.
इतर बातम्या :