15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण, 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी, असं करा रजिस्ट्रेशन
Corona Vaccination For Children : पुढील महिन्यात अल्पवयीन मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणासाठी
![15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण, 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी, असं करा रजिस्ट्रेशन Corona Vaccination For Children know about vaccination registration 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण, 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी, असं करा रजिस्ट्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/22/9c4fe5684b193d641a5822574a27ebb9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona Vaccination For Children : कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतात आता अल्पवयीन मुलांचेही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. भारतात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या अल्पवयीन मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखी असणार आहे.
लसीकरणासाठी अल्पवयीन मुलांची नोंदणी CoWin अॅपद्वारे होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, एक जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
आतापर्यंत 141 कोटींहून अधिक लसीचे डोस
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 141 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 29 लाख 93 हजार 283 डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा आकडा 141 कोटी 70 लाख 25 हजार 654 वर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)