एक्स्प्लोर

Fact Check : लसीकरणाच्या नावाने लोकांच्या शरीरात मायक्रोचीप बसवली जातेय?

देशातील लसीकरण मोहिमेबाबत विविध अफवा सोशल मीडियावर पसवल्या जात आहेत. मात्र या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी लसीकरण करुन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहकार्य केले पाहिजे.

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. तज्ज्ञांनी लसीचे वर्णन कोरोनाविरूद्धच्या लढाईतील संरक्षक ढाल म्हणून केले आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी म्हणून एक मोठी मोहीम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीपासूनच काही अफवा सतत पसरत असल्या तरी दरम्यान, सोशल मीडियावर एक नवीन दावा व्हायरल होत आहे. या दाव्यात असे म्हटले जाते की सरकार लसीच्या बहाण्याने लोकांच्या शरीरात मायक्रोचिप ट्रान्सप्लांट करत आहे. अशा दाव्यांशी संबंधित बरेच व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि मेसेजबाबत सत्य काय आहे जाणून घेऊयात? 

 सोशल मीडियावरील दावा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार कोरोना लसीच्या बहाण्याने लोकांच्या शरीरावर मायक्रोचिप ट्रान्सप्लांट करत आहे, जेणेकरून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येईल.

मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओज आणि मेसेजेसमध्ये तथ्य नाही. लसीकरणाबाबत या निव्वळ अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच सरकारने पासपोर्टसाठी लसीकरण अनिवार्य केले असल्याची कोणतीही बातमी नाही. अशा परिस्थितीत तपासणीनंतर सोशल मीडियावर केलेला हा दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर अशी अफवा पसरल्या गेल्या होत्या की बिल गेट्स लोकांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्यासाठी लसीकरणाचा वापर करत आहेत. तपासणीनंतर हा दावाही खोटा असल्याचे दिसून आले. 

देशातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम केवळ तीव्रच केली नाही तर कोविन पोर्टलवर अनिवार्य नोंदणीही दूर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घ्यावेत जेणेकरुन कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकले जाऊ शकेल.

लसीकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकलं

कालच्या (28 जून) आकडेवारीनुसार, कोरोना लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली.  भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने 32.36 कोटींचा टप्पा पार केला. काल सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 17,21,268 लसी देण्यात आल्या.  कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget