एक्स्प्लोर

Corona Update : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची  

India Corona Update : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून भारत सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताशेजारील देशांमधून येणाऱ्या सहा देशांतील प्रवाशांना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. 

Corona Update : जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना (Corona) झपाट्याने पसरत आहे. चीनमध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्वच देशांमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजून तरी कोरोनाची चौथी लाट आलेली नाही. परंतु, कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून भारतात देखील महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताशेजारील देशांमधून येणाऱ्या सहा देशांतील प्रवाशांना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. 

Corona Update : या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर सक्तीची

चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर  चाचणी होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.  

Corona Update : निगेटिव्ह आलावल सादर करावा लागणार

आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून या देशातून येणाऱ्या प्रवाशांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे. नव्या वर्षात चीनमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. 

Corona Update :  आतापर्यंत तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

आरोग्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण  सुरु करण्यात आले आहे.  यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते. यासाठी दोन टक्के प्रवाशांचे नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात येत होते. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता या सहा देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आतापर्यंत परदेशातून येणाऱ्या 79688 प्रवाशी परदेशातून भारतात आले आहेत यातील 1466 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यातील तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.   

महत्वाच्या बातम्या

दोन दिवसांत परदेशातून येणाऱ्या 39 प्रवाशांना कोरोना, विमान प्रवासासाठी केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, एकाच दिवसात दरात 10 हजार 400 रुपयांची वाढ, सोन्याच्या दरालाही झळाळी
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
इराण इस्त्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायिकांना फटका, जाणीपूर्वक गॅसचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 
Air India Fuel Surcharge : इराण युद्धाचा फटका विमान प्रवासाला, एअर इंडियाचे तिकीट दर महागले, इंधन दरवाढीमुळे अधिभार लागू
इराण युद्धाचा फटका विमान प्रवासाला, एअर इंडियाचे तिकीट दर महागले, इंधन दरवाढीमुळे अधिभार लागू

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget