Corona Update : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र, खबरदारी घेण्याच्या सूचना
Corona Update : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Corona Update : कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रातून राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पाच कलमी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले आहे.
"आगामी काळात आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये सण आणि उत्सव साजरे केले जातात. या सणांसाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच कलमी कार्यक्रमांतर्गत कोरोनाविरूद्ध लढणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे.
To minimise Covid-19 infection, there's need to focus on five-fold strategy of testing, tracking, treating, vaccinating & adhering to Covid appropriate behaviour in view of upcoming festive season when states are likely to witness mass gatherings: Union Health Secretary to States pic.twitter.com/co7V9wSU8A
— ANI (@ANI) June 28, 2022
काय आहे पाच कलमी कार्यक्रम?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पाच कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या कलमांतर्गेत राज्यांनी कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरण या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कोरोना रूग्णामध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी घेण्यासह लसीकरणावर भर देण्याच्या सूचना देखील राज्यांना देण्यात आल्या आहेत. देशात गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 793 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.