(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोना सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
रविवारी भारतात कोरोनाबाधित 93,249 रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी यावर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा केली जात आहे. कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉ. विनोद पॉल या बैठकीला उपस्थित आहेत.
रविवारी भारतात कोरोनाबाधित 93,249 रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी यावर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रु्ग्णांची संख्या 1 कोटी 24 लाख 85 हजार 509 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 18 सप्टेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. 18 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित 93,337 रुग्णांची नोंद झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 513 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 1,64,623 वर गेली आहे.
Corona Vaccination | राज्यात काल दिवसभरात विक्रमी 4,62,735 जणांचं लसीकरण
देशभर सध्या 6 लाख 91 हजार 597 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण 5..54 टक्के आहे. रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93.14 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. देशात 12 फेब्रुवारी रोजी सर्वात कमी 1,35,926 लोक कोरोनाबाधित होते. आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 लोक कोरोनामुक्त झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.32 टक्के आहे.
Coronavirus | मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर
राज्यात काल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद
राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.
मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत