एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर
शहरातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येचा विचार करता मुंबई महापालिकेने (BMC) आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.
मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना यामध्ये 90 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या निवासी सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.
मुंबईत आतापर्यंत पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने 681 इमारती तर आठ हजार 790 इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.
मुंबई महापालिकेची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे,
- सोसायटीमध्ये वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.
- या नियमाचे पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी करावी.
- घराबाहेर पडताना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोज्यांचा वापर करुन बाहेर पडावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
- सोसायटी-वसाहतीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.
- सोसायटीत दरवाज्याची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
- सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा.
- लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कचऱ्याच्या डब्यात टाकावेत.
- सोसायटीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात धुवावेत.
- सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
- बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी.
- ऑनलाईन पार्सल मागवल्यानंतर, सोसायटीमध्ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे अशा एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
- तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्यावे. शक्य असल्यास काही तास ते पार्सल खुल्या जागेत राहू द्यावे आणि नंतर घरात न्यावे.
- सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्पर्श करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
- स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे महत्त्वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.
महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement