एक्स्प्लोर

Agusta Westland: 'भ्रष्ट' ऑगस्टा वेस्टलँड भाजपच्या लाँड्रित स्वच्छ झाला; राहुल गांधींची खोचक टीका

Congress On VVIP Helicopter: युपीएच्या सत्ताकाळात झालेल्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कथित घोटाळा प्रकरणी भाजपने काँग्रेसवर लाचखोरीचे आरोप केले होते.

Rahul Gandhi On Agusta Westland: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ऑगस्टा वेस्टलँड मालकीची कंपनी फिनमेकानिकासोबतच्या व्यवहारावरील निर्बंध हटवले असल्याचे वृत्त समोर आले. त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली. मोदी सरकार आणि फिनमेकानिका दरम्यान गुप्त करार झाला आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. भारत सरकारने 12 व्हीआयपी हेलिकॉप्टरच्या खरेदीशी निगडीत असलेल्या करार, अटींचे उल्लंघन आणि लाचखोरीच्या आरोपांवरून फिनमेकानिकाची ब्रिटीश कंपनी ऑगस्ट वेस्टलँडसोबतचा करार संपुष्टात आणला होता.  

राहुल गांधींची खोचक टीका

भाजपने काँग्रेसवर व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीच्या मुद्यावर टीका केली होती. काँग्रेस नेत्यांनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून 450 कोटी रुपयांची कथित लाच स्वीकारली असल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपने या मुद्यावर काँग्रेसविरोधात रान उठवले होते. आता फिनमेकानिका कंपनीसोबत खरेदी करारावर लावलेले निर्बंध हटवल्याच्या वृत्तानंतर राहुल गांधी यांनी खोचक टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, याआधी ऑगस्टा भ्रष्ट होता. आता भाजपच्या लाँड्रित धुवून स्वच्छ झाला आहे. 

रणदीप सुरजेवाला यांचे केंद्राला प्रश्न 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, मोदी सरकारकडून काही बनावट दस्ताऐवज लीक करण्यात आले. त्यातून युपीए सरकारविरोधात खोट्या गोष्टी पेरण्यासाठी हजारो तास वाया घालवले. युपीए सरकारवर आरोप करणारे मोदी सरकार आणि ऑगस्टा/फिनमेकेनिका दरम्यान झालेल्या गुप्त सौद्यावर प्रश्न उपस्थित करतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेली इटलीतील कंपनी लिओनार्डोवरील (आधीचे नाव फिनमेकेनिका) केंद्र सरकारने बंदी हटवली आहे. ही बंदी हटवल्यामुळे भारत सरकार आता लिओनार्डो कंपनीकडून शस्त्र आणि लष्करी उपकरण खरेदी करण्यासाठी नवीन करार करू शकतात. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अंशत: बंदी हटवली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
FSSAI Water Testing: पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यावर देखरेख वाढवा, दोषींवर कठोर कारवाई करा, FSSAI कडून सर्व राज्यांना निर्देश; पिण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी देशव्यापी मोहीम
पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यावर देखरेख वाढवा, दोषींवर कठोर कारवाई करा, FSSAI कडून सर्व राज्यांना निर्देश; पिण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी देशव्यापी मोहीम
UP Election Survey 2027 : उत्तर प्रदेशचा खळबळजनक सर्व्हे समोर! सत्तेसाठी समाजवादी आणि भाजपमध्ये कट टू कट फाईट; टक्केवारीत सपा पुढे तर मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?
उत्तर प्रदेशचा खळबळजनक सर्व्हे समोर! सत्तेसाठी समाजवादी आणि भाजपमध्ये कट टू कट फाईट; टक्केवारीत सपा पुढे तर मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती?
Rahul Gandhi : राहुल गांधींचे नाव आणि फोटो येताच फेसबुकवर पोस्ट ब्लॉक? मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका; नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधींचे नाव आणि फोटो येताच फेसबुकवर पोस्ट ब्लॉक? मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget